Shastradnyanche Jag | शास्त्रज्ञांचे जग
Shastradnyanche Jag | शास्त्रज्ञांचे जग
आपण बयाचदा कुणाकडूनतरी स्फूर्ती घेतो. ही स्फूर्तिस्थाने प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असतात. विज्ञानक्षेत्रातल्या व्यक्तींच्या दृष्टीने वेगवेगळे शास्त्रज्ञ हेच इतर वैज्ञानिकांचे स्फूर्तिदाते असतात. शास्त्रज्ञांचे वर्णन करायचे तर आपल्या मंद प्रकाशाने तेवत राहणाया या ज्योती पुढच्या अनेक पिढ्यांना वाट दाखवत राहतात़ या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञांचीच चरित्रे आहेत असे नाही, तर काही विज्ञानलेखकांच्या चरित्रांचासुद्धा यात समावेश आहे, कारण त्यांच्या लेखनाने अनेक तरुणांना विज्ञानक्षेत्राकडे आकर्षित केले आहे. हे पुस्तक वाचकांना आवडेल अशी खात्री वाटते.