Shatakantika | शतकान्तिका

Shatakantika | शतकान्तिका
या ग्रंथातील पाच कथा म्हणजे महत्त्वाकांक्षी, करिअर करू पाहणाऱ्या पंचकन्यांच्या शतकान्तिका आहेत ! मोठ्या कंपनीत इ. डी. चे अधिकारपद मिळूनही एकाकी राहिलेली धारिणी, षोडशवर्षीय मुलीच्या प्रश्नांनी अस्वस्थ होणारी रागिणी, आपल्या महत्त्वाकांक्षी स्वभावाने स्त्रीमुक्तिवाल्या सासूला गारद करणारी हिमानी ही आजच्या जमान्यातल्या स्त्रियांची रूपे आहेत. रोगग्रस्त नवऱ्याच्या अखेरच्या श्वासासाठी उतावीळ झालेली पत्नी आणि प्रियकराकडून बालिश आणि विक्षिप्त अपेक्षा ठेवणारी बब्बड, राणी ,मेघना म्हणजे ट्रॅजिक आणि कॉमिक अशा दोन्हींचे मिश्रण आहे. शतकान्तिकामध्ये तीन सूत्रे आहेत. वरवर पाहता विनोदी, बोचरे वाटणारे पण अंतर्यामी शोकात्म असलेले वास्तव आणि त्याचबरोबर स्त्रीजीवनात झालेली शतकांतर्गत स्थित्यंतरे. वसंत नरहर फेणे यांनी हा स्फोटक आशय आकर्षक नेमकेपणाने या कथांमधून मांडला आहे.