Shekespearechya Deshatil Kavi | शेक्सपिअरच्या देशातील कवी

Shekespearechya Deshatil Kavi | शेक्सपिअरच्या देशातील कवी
‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे पुस्तक म्हणजे इंग्रजी काव्यक्षेत्रातील प्रमुख कवींचा संक्षिप्त परिचय आहे. या पुस्तकातून लेखकाने इंग्लंडमधील 21 कवींची मराठी वाचकांना ओझरती ओळख करून दिली आहे. ती करून देताना कवींच्या काव्यपटापेक्षा त्यांचा जीवनपट थोडक्यात साकारला आहे. त्यातून या कवींच्या काव्याचे जसे ओझरते दर्शन होते, तसेच इंग्लंडमधील ज्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात ते काव्य जन्माला आले, त्याचेही दर्शन या पुस्तकात वाचकाला होते. जेफ्री चॉसर हा इंग्रजी काव्याचा जनक समजला जातो. त्यामुळे त्याच्यापासून सुरू झालेली ही जीवनयात्रा डिलन थॉमस या कवीपर्यंत येऊन थांबते. थेम्स नदीच्या तीरावर मारलेला हा सात शतकांचा फेरफटका वाचकाला स्तिमित तर करून जातोच, पण एक प्रकारे समृद्धही करून जातो.