Shelka Saj | शेलका साज

Shivaji Sawant | शिवाजी सावंत
Regular price Rs. 176.00
Sale price Rs. 176.00 Regular price Rs. 195.00
Unit price
Shelka Saj ( शेलका साज ) by Shivaji Sawant ( शिवाजी सावंत )

Shelka Saj | शेलका साज

About The Book
Book Details
Book Reviews

हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लफंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार कंगोर्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!

ISBN: 978-8-17-766695-3
Author Name: Shivaji Sawant | शिवाजी सावंत
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 170
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products