Sherlock Holmesche Kadambri Vishwa | शेरलॉक होम्सचे कादंबरीविश्व

Sherlock Holmesche Kadambri Vishwa | शेरलॉक होम्सचे कादंबरीविश्व
शेरलॉक होम्स हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. शेरलॉक होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय बुद्धिमत्ता, चातुर्य व अचूक तर्कशास्त्र असलेले होम्स लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असत! १८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या शेरलॉक होम्सवर, कॉनन डॉयल यांनी चार कादंबर्या आणि छपन्न लघुकथा लिहिल्या. शेरलॉक होम्सच्या चार कादंबर्यांपैकी, सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून वाचकांनी द हाउंड ऑफ द बास्करव्हिल्सला (१९०१) या पहिल्या कादंबरीला विशेषत्त्वाने स्थान दिलेले आहे. ज्यात गुप्तहेर शेरलॉक होम्स आहेत. द हाउंड ऑफ द बास्करव्हिल्स, ही कादंबरी द स्ट्रँड मॅगझिन (१९०१-०२) मध्ये क्रमशः प्रसिद्ध होत होती. १९०२ मध्ये ती पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी द साइन ऑफ फोर, लिपिनकॉट्स मंथली मॅगेझीन या मासिकेत १८९० साली प्रकाशित झाली. ‘अ स्टडी इन स्कार्लेट’ ही १८८७ मध्ये आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेली तिसरी गुप्तहेर कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये शेरलॉक होम्स आणि डॉ. वॉटसन हे पहिल्यांदाच एकत्र येतात. कादंबरीच्या आशयाचे-खुनाच्या तपासाचे वर्णन डॉ. वॉटसन यांनी ‘ए स्टडी इन स्कार्लेट’ असे केलेले आहे. स्कार्लेटचा म्हणजेच शेंदरी-रक्तवर्णी रंगातला जीवघेणा खेळ, हा या कादंबरीच्या आशयाचा मुख्य भाग आहे. द व्हॅली ऑफ फिअर ही सर आर्थर कॉनन डॉयल यांची चौथी आणि शेवटची कादंबरी आहे. हे मॉली मॅग्युअर्स आणि पिंकर्टन एजंट जेम्स मॅकपार्लँडवर आधारित आहे. ही कथा स्ट्रँड मॅगझिनमध्ये सप्टेंबर १९१४ ते मे १९१५ दरम्यान प्रथम प्रकाशित झाली होती.