Shetkaryancha Raja : Shri Chatrapati Shivaji Maharaj | शेतक-यांचा राजा : श्री छत्रपती शिवाजी महाराज

Shetkaryancha Raja : Shri Chatrapati Shivaji Maharaj | शेतक-यांचा राजा : श्री छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्यच मुळी आई-मुलाचे मिळून होते म्हणून त्यास पावित्र्य आले. या राजांच्या आईवडिलांनी तीन बादशहांचे कटू अनुभव घेतले होते, म्हणून हिंदवी स्वराज्य सह्याद्रीत घडले. सह्याद्री जलदुभाजक आणि काळ्या बसाल्ट खडकांचा बनलेला आहे. राजांनी सह्याद्री हा संरक्षक मानला. हरहर महादेव झाला. त्याच्या उंच शिखरांवर शेल्या पागोट्याचे दुर्ग बांधले. शेवटपर्यंत राजा दुर्गावरच राहिला. भूखंडीय बेटांवर जलदुर्ग बांधले. या दुर्गांनी मराठी संस्कृतीचे रक्षण केले. राजांनी स्त्रियांना वंदनीय मानले. भूक येथील अर्थशास्त्र होते. तर युद्धांचा केंद्रबिंदू पिळवणूक झालेला शेतकरी होता, राजा हिंदू होता पण स्वराज्य सर्वांचे होते. राजा गरीब शेतकऱ्यांच्या घराघरांतून गेला. तरुणांना संघटित केले. त्याच्या हातात तलवार दिली आणि ज्यांना देश, धर्म, परकीय कळत नव्हते अशा स्वकीयांशी लढला. धर्मांध बादशहा, धर्मप्रसारक पोर्तुगीज, डच, व्यापारी इंग्रज यांना झुंज दिली. खेड्यांतील जीवांसाठी पुरंदरचा तहही मान्य केला. राजाने 'दया तेथ धर्म' मानवता हाच धर्म मानला. तसे 'तुझ्या समोर लढण्यास उभा आहे तो तुझा शत्रू आहे.' हे श्रीकृष्णाचे तत्त्व जपले. राजांचे जीवन आपल्या समोर आदर्श आहे. म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक आपल्या घरात वाढणाऱ्या जिजाऊ व शिवाजीसाठी विकत घ्यावे. हे गोष्टींचे पुस्तक नाही. ही कादंबरी नाही. महाराष्ट्राचा इतिहास आहे. एतद्देशीयांचे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा.