Shevatacha Dis |शेवटचा दिस

Shevatacha Dis |शेवटचा दिस
नाटककार आणि निबंधकार म्हणून स्वत:चे वेगळे स्थान असणारे गो. पु. देशपांडे यांचे 'शेवटचा दिस' हे नाटक बुद्धिवादी व ध्येयनिष्ठ राजकारण करणार्या गटांमधील प्रेम, स्पर्धा, संपत्ती, असूया अशा विविध मानवी विकारांचे चित्रण करते. कर्मसिद्धान्ताचा आणि 'मॉडर्न स्टेट' चाही विचार ते करते. डाव्या संघटनेची निर्णयपद्धती आणि कार्यशैली तिच्या अंतर्गत काम करणार्या स्त्री-पुरुषांचे परस्परसंबंध अशा एरवी 'नाट्यविषय' न होणार्या गोष्टी येथे येतात. साम्यवाद्यांतील रक्तपाती दहशतवादाचे राजकारण करणारा गट आणि त्या गटाच्या अंतर्गत चाललेले दुसरे राजकारण या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे.