Shevatchi Ladhai | शेवटची लढाई

Shevatchi Ladhai | शेवटची लढाई
सद्य राजकीय-सामाजिक स्थिती म्हणजे विसंगतीचे भेंडोळे आहे. ह्या भेंडोळ्यात सारी नीतीमत्ता गुंडाळून ठेवलेली आहे. ही स्थिती कोणाही विचारवंताला विचारात पाडणारी आहे. यादवांसारख्या विचारवंत लेखनाला त्यावर कोरडे ओढावेसे वाटणे साहजिकच. हा विनोद सातमजली हास्याचा नसून स्मितरेषा उमटवत उमटवत विचार करायला लावणारा आहे.संग्रहातील आनंद यादवांची भूमिका ही केवळ मनोरंजनकाराची नाही; तर ती सध्याच्या भ्रष्ट मराठी जीवनाचा विनोद-उपरोधाच्या अंगांनी वेध घेणाऱ्या भाष्यकाराचीही आहे. त्यांच्या या दृष्टीमुळेच या संग्रहाचा आस्वाद घेणारा वाचकही हसता हसता शेवटी अंतर्मुख होतो, हे या संग्रहाचे खास वेगळेपण मानावे लागते.