Shilp | शिल्प

Shilp | शिल्प
ह्या कथासंग्रहामधील सगळ्या कथांमधून एका व्यापक संस्कृतीचं दर्शन आपल्याला होतं. त्या कथांत अनेक पिढ्या आहेत, अनेक कुटुंबं आहेत, अनेक नातीगोती आहेत. आणि मुख्य म्हणजे मोनिका कलावंत असल्याकारणानं या कथांत कलावंतांनाही महत्त्वाचं स्थान आहे. ह्या पात्रांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं-विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत, त्यामध्ये वेदनांचा धागा आहे. त्या अनेक प्रकारे दु:खी आहेत. त्या वेगवेगळ्या दु:खाला आपापल्या ताकदीनिशी सामोर्या गेल्या आहेत. त्या स्त्रियांत परित्यक्ता आहेत, घटस्फोटिता आहेत, विवाहबाह्य संबंध ठेवणार्याही आहेत. सिंगल पेरेंटशीप आहे. बलात्कार झालेली स्त्रीही आहे.