Shinemachya Shtori Magil Goshta |शिणेमाच्या ष्टोरी मागील गोष्ट

Shinemachya Shtori Magil Goshta |शिणेमाच्या ष्टोरी मागील गोष्ट
कोणत्याही सिनेमाची कथा ऐकण्याची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते. अशा कथा सांगणारी बरीच मंडळी असतात. मात्र, चित्रपटांच्या पडद्यामागच्या कथा सांगणारी माणसं विरळाच. अभिजीत देसाई यांच्या या पुस्तकात अशा चटकदार आणि मजेशीर कथा वाचायला मिळतात. नया दौर, मुगल-ए-आझम, मदर इंडिया, तिसरी मंझिल, प्यासा, गाइड, संगम, शोले अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांच्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या हकिकती आणि सुरस कथा असामाहितीनीचा खजिनाच वाचकासमोर खुला होतो. कथा सांगताना कलाकार, दिग्दर्शकांची स्वभाववैशिष्ट्येही समजतात. सिनेमा या कलाप्रकारची उत्तम जाण, मुद्देसूद मांडणी आणि रसाळ, प्रवाही भाषा ही पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.