Shiv Charitra Vrutasangraha khand 1 To 3 | शिव चरित्र वृत्तसंग्रह खंड १ ते ३
Shiv Charitra Vrutasangraha khand 1 To 3 | शिव चरित्र वृत्तसंग्रह खंड १ ते ३
शिवचरित्र वृत्तसंग्रह, खंड १ ते ३ यातील खंड १ चे अनुवादक श्री पां. भी. देसाई आणि खंड २ व ३ चे संपादक इतिहास संशोधक ग. ह. खरे आहेत. खंड १ मधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित ८ बखरीवजा गद्यपद्यात्मक कानडी ग्रंथांचा अनुवाद दिलेला आहे. खंड २ मधे आदिलशाही इतिहासाची माहिती देणारे मुहम्मदनामा, तारीख-इ-अली, अलीनामा, हफ्तकुर्सी आणि बसातीनुस्सलातीन या पाच पुस्तकांचे भाषांतर सारांशरुपाने दिले आहे. खंड ३ मधे फुतुहात-इ-आदिलशाही, आलमगीर-नामा, मुस्तखबुल-लुबाब आणि मआसिर-इ- आलमगीरी या चार फार्सी ग्रंथातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित माहिती सारांश रुपाने दिलेली आहे.