Shivpratap Dinvishesh | शिवप्रताप दिनविशेष

Shivpratap Dinvishesh | शिवप्रताप दिनविशेष
शिवरायांनी ५० वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याची निर्मितीच केली नाही, तर नीतिमत्तेचे अनेक आदर्श घालून दिले... १८३०६ दिवसांचे त्यांचे आयुष्य ! मात्र आयुष्याच्या प्रत्येक दिवसावर एक ग्रंथ होईल असे अफाट कर्तृत्व ! त्यांच्या धाडसाच्या व्यूहरचना, प्रसंगोचित राजकारण, प्रजेसाठी समतोल समाजकारण, समयोचित युद्धकारण या सर्वांनी त्यांचे आयुष्य व्यापलेले आहे. या समग्र इतिहासाचा धांडोळा या पुस्तकातून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकांनी केला आहे. त्यांच्या शिवप्रताप दिनाचे, प्रत्येक दिवसाचे महत्व तरुण पिढीला आणि लहानमोठयांना कळावे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर आहे यात शंका नाही.