Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set | शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच
Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set | शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच
शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे अनेक निष्ठावान मावळे होऊन गेले.
• बहिर्जी नाईक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख, जे वेश बदलून शत्रूच्या गोटातून माहिती मिळवत असत.
• नेतोजी पालकर: शिवरायांचे सरसेनापती, ज्यांनी सुलतानी संकटांशी दोन हात करून गावाचे रक्षण केले आणि अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवला.
• तानाजी मालुसरे: निष्ठावान मावळा, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य दाखवून विजय संपादन केला आणि सिंहगड मोहिमेत अजरामर झाले.
• हंबीरराव मोहिते: 'मोडेल पण वाकणार नाही' वृत्तीचे, रांगडे सरसेनापती ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळात अमोघ कार्य केले.
• शिवा काशीद: शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, शिवरायांसारखे दिसणारे एक सामान्य कुटुंबातील शूरवीर.
• बाजीप्रभू देशपांडे: पहाडासारखे भक्कम शरीराचे, पराक्रमी लढवय्ये आणि प्रशासनातही पारंगत असलेले महान योद्धा.
• कान्होजी जेधे: शहाजीराजांचे विश्वासू सरदार आणि मावळ भागातील देशमुखांना एकत्र करून स्वराज्यात आणणारे जुने जाणते व्यक्तिमत्त्व.
• जिवाजी महाला: भेदक नजर आणि भरभक्कम शरीरयष्टी असलेले दांडपट्टा बहाद्दर, ज्यांनी सय्यद बंडाचा हात कलम करून महाराजांचा जीव वाचवला.
• येसाजी कंक: चपळ, निर्भय आणि धाडसी व्यक्तिमत्त्व, जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात उभे राहिले.
• कोंडाजी फर्जंद: अचाट धाडस असलेले, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला युद्धासाठी आव्हान देणारे महावीर.
• बाजी पासलकर: मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील पहिली समिधा.
• प्रतापराव गुजर: धाडसी वीर आणि हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती ज्यांनी साल्हेर येथे मुघलांचा पराभव केला.
• रामजी पांगेरा: 'अग्नीप्रमाणे वीर' असे वर्णन केलेले पराक्रमी योद्धा, ज्यांनी कण्हेरगडावर दिलेरखानाच्या हजारो सैन्याला माघार घ्यायला लावली.
• मुरारबाजी देशपांडे: पुरंदरच्या लढाईत प्रचंड शौर्य गाजवणारे, ज्यांच्या पराक्रमाने दिलेरखानही थक्क झाला.
• नऱ्हेकर देशपांडे (बापूजी, चिमणाजी, बाळाजी, केसो नारायण, नारायण): खेडेबारेतील ही कुटुंबियांची तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले.
• फिरंगोजी नरसाळा: चाकणचे शूर किल्लेदार, ज्यांनी शाहिस्तेखानाच्या हजारो सैन्याला केवळ तीनशे मावळ्यांनिशी छप्पन्न दिवस झुंजवले.
• हिरोजी इंदुलकर: वास्तूविशारद, ज्यांनी सिंधुदुर्ग आणि रायगडची अप्रतिम रचना केली आणि आपली स्वामीनिष्ठा दाखवली.
• बाळाजी आवजी चिटणीस: शिवरायांना राजापुरात मिळालेले अनमोल रत्न, ज्यांनी आपल्या मोत्यासारख्या अक्षराने अनेक नाजुक प्रश्न सोडवले.