Shivtirth Raigad | शिवतीर्थ रायगड

Shivtirth Raigad | शिवतीर्थ रायगड
प्रख्यात दुर्गप्रेमी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे हे पुस्तक. त्यांच्या रसाळ, ओघवत्या वर्णनात्मक शैलीचा प्रत्यय या पुस्तकातून येतो. महाष्ट्रातील सर्व किल्ले त्यांनी अभ्यासले होते. तो अभ्यास त्यांच्या लेखनातही उतरला होता. त्यामुळेच १९६५ मध्ये लिहिलेल्या या पुस्तकातून मिळणारा आनंद आजही टिकून आहे. रायगडच्या आणि गडावरील बारीक सारीक गोष्टी त्यांच्या लेख्ननातून दृश्यमान होतात. रायगडाकडे जाणारी वाट, परिसर, शिवपूर्वकालीन रायगड, घेरा आणि तटबंदी, बालेकिल्ला, समाधी, दारूची कोठारे यांच्या माहितीसह गडाची यात्रा कशी करावी याचे मार्गदर्शनही त्यांनी पुस्तकात केले आहे. 'रायगड हे स्वातंत्र्याचे महातीर्थ आहे. जो महाराष्ट्र देशी जन्मला त्या प्रत्येकाने जन्मातून एकदा तरी रायगडाची वारी केलीच पाहिजे, असे ते सांगतात. ते खरेचं नाही का!.