Shobhadarshak | शोभादर्शक

Shobhadarshak | शोभादर्शक
जगातील सर्व धर्मांचे प्रवर्तक पुरुष होते. येशू, पैगंबर, शंकराचार्य, जैनमुनी आणि बुद्ध सारेच पुरुष. त्यांनी स्त्री-धर्म पुरुषापेक्षा निराका केला आणि त्यातही पुरुषाला झुकते माप दिले आणि स्त्री जीवन पुरुषकेंद्री बनण्याच्या प्रक्रियेला नैतिक अधिष्ठानही दिले. जेव्हा पुरुष प्रस्थापित धर्म नव्हते तेव्हाचे स्त्री जीवन कसे होते? पुरुषाचे जीवन कसे होते? त्यातील वेगकेपण नेमके कोणते आणि ते वेगकेपण तयार होण्यामागच्या प्रेरणा नैसर्गिक होत्या की मानवनिर्मित अशा सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह आजवरच्या तत्त्वज्ञानातून, साहित्यातून, कलांमधून होत आला आहे. त्याची ओकख झाली तर आपल्या जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत होईल म्हणून हा खटाटोप.