Shodh Adhunik Bharatacha | शोध आधुनिक भारताचा

Shodh Adhunik Bharatacha | शोध आधुनिक भारताचा
स्वातंत्र्य आले तेव्हा भारतापुढे एवढ्या समस्या व आव्हाने होती की स्वातंत्र्यपूर्वकाळापेक्षाही अधिक इमैंने व स्वार्थत्यागाच्या उमीने सर्वांनी पुढे सरसावायला हवे होते. पण घडले विपरित, भारतीयांत जे हीण होते त्याचाच तवंग आणि दुर्गंधी पुढील तीन तपात सर्वत्र पसरली आहे. हे असे का घडले ? काही विचारवंत सांगतात- 'टिळक, गांधी, सावरकरांसारखे आदर्शच राहिले नाहीत. हे फारच वरवरचे कारण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात जे भारतीय व्यक्तिमत्व होते ते स्वातंत्र्योत्तर काळात जसेच्या तसे राहिले हे तर कारण नसेल ? व्यवहार आणि परमार्थ यांची संपूर्ण फारकत, मोबदला आणि श्रम यांचा मेळ नसणारी अर्थव्यवस्था, विज्ञानाकडे पाठ व यामुळे नव्या संशोधनाचा अस्त, जातीभेदांचा विलक्षण पगडा, न्यूनगंडामुळे सत्ताधीशांच्या लांगूलचालनाची व दांडग्यांच्या अनुनयाची वृत्ती कमालीचे दारिद्र्य, गुरु, गोसावी, बैरागी, मांत्रिक, बुवा यांचे अज्ञानी समाजावरील प्राबल्य ही भारतांतील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाची शोकांतिका होती. न्या. रानडे, फेरोजशहा मेहता, गोखले, टिळक, आंबेडकर यांच्या प्रयत्नाने भारतीय व्यक्तिमत्वात बदल करण्याची व वरील शोकांतिकेतून बाहेर पडण्याची निकड समाजाला पटत चालल्याचे चिन्हं तरी काही काळ दिसत होते. पण १९२० साली वास्तवाशी फारकत सुरू झाली. १९२० नंतरच्या नेतृत्वाने नेमके काय केले ? आपल्या सद्यस्थितीतील दूरावस्थेची मुळे कोठे आहेत ? या आणि अशा प्रश्रांचा भारतीय व्यक्तिमत्वाच्या अनुरोधाने वेध घेणारा लेखसंग्रह.