Shodh Asmitecha | शोध अस्मितेचा

Shodh Asmitecha | शोध अस्मितेचा
डॉ. रमा गोळवलकर यांची काश्मीरच्या इतिहासावरील हि आगळी वेगळी आशयसंपन्न कादंबरी वाचकाला अंतःर्मुख तर करतेच आणि आपल्यात एक वेगळाच प्रकाश प्रकट करते .वर्तमान आणि इतिहास यातले मनोज्ञ नाते समजून घेण्याला ती आपल्याला प्रवृत्त करते . पार्श्वभूमीला प्रेमकथेचे अस्तर असलेली हि विलक्षण कहाणी कुठेही भाबडी प्रेमकथा होत नाही . ती अस्मितेच्या शोधाचेच रूप घेते . लुबना खानम आणि ललितादित्य हे दोघेही पुन्हा एकदा एक हजार वर्षांपूर्वीचा भूतकाळ अनुभवतात .त्या विलक्षण घटनातून पुन्हा एकदा जातात . लेखिकेने इथे या कथेला केवळ इतिहास दिला नाही तर त्याला एका ललित कादंबरीचे अभिनव रूप दिले आहे .