Shodh Gandhincha | शोध गांधींचा

Shodh Gandhincha | शोध गांधींचा
गांधीजी आणि त्यांचे विचार हा लेखक न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा श्रद्धेचा विषय आहे. न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांना गांधींचा शोध घ्यावासा वाटला ,त्याचे कारण अवतीभोवतीचे दिवसेंदिवस खालावत चाललेली भारतीय सामाजिक स्थिती... या लेखनामागे या परिस्थितीकडे लक्ष वेधणे एवढाच हेतू नसून आजही कालबाह्य न झालेल्या गांधीविचारांच्या आधारे एकविसाव्या शतकातील समस्या कशा सोडवता येतील याचे विवेचन करणे हा आहे. गांधीजींचे हे विचार केवळ व्यक्तीप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य न मानता जिज्ञासू, निरपेक्ष वृत्तीने आणि तटस्थता कायम ठेवून या विचारांचा विचार आजच्या संदर्भात करावाच लागेल.