Shodh Maharashtracha | शोध महाराष्ट्राचा

Shodh Maharashtracha | शोध महाराष्ट्राचा
महाराष्ट्राच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या इतिहासातल्या अनेक स्थित्यंतरांचा वेध विजय आपटे यांनी या ग्रंथात घेतला असून, सातवाहनांच्या काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत असा या पुस्तकाचा सुदीर्घ आवाका आहे. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांपासून ते शिवशाही, पेशवाई अशा महाराष्ट्राच्या इतिहासातल्या विविध महत्त्वपूर्ण टप्प्यांची माहिती यात वाचायला मिळेल. महाराष्ट्र असा घडला, महाराष्ट्रात असे घडले, महाराष्ट्रात असे घडावे असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. आपटे यांचा हा पहिलाच ग्रंथ. भूमिका आणि ऋणनिर्देशमध्ये आपटे म्हणतात - ...या पुस्तकाची माझ्या मनात सुरवात झाली ती मराठी माणसाला झालंय तरी काय? या मला पडलेल्या कोड्यापासून. या कोड्याचं उत्तर शोधता शोधता माझं इतिहासाचं वाचन सुरू झालं. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी आपटे यांनी संदर्भसाहित्य म्हणून असंख्य पुस्तकं तर वाचलीच; पण संकीर्ण लेख, इंटरनेटवरची माहिती, मान्यवरांची भाषणं- मुलाखती यांचाही उपयोग करून घेतला आहे.