Shodh Mahatma Gandhincha : Khand 2 | शोध महात्मा गांधींचा : खंड २

Shodh Mahatma Gandhincha : Khand 2 | शोध महात्मा गांधींचा : खंड २
हे चरित्र नव्हे किंवा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासही नव्हे... शोध आहे आपल्या हयातीतच आख्यायिका होऊन राहिलेल्या अनेक नामवंत या आख्यायिकेने मारले गेले. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे एका महामानवाच्या सार्वजनिक जीवनाचा. सामान्य माणूस गोंधळून जातो.. विचारवंतांच्या लेखनात समाधानकारक उत्तरे सापडत नाहीत. कारण त्याला पूर्वीपासून पडलेल्या अगदी साध्या साध्या शंकांनाही गांधींच्या किंवा गांधींच्या मूलभूत प्रेरणा संतत्वाच्या असूनही स्वतः च्या राजकारणाचेही अध्यात्मीकरण त्यांना का साधले नाही ? त्यांच्यासारख्या महात्म्याचे नेतृत्व मिळूनही हिंदुस्थानची अधोगती का? अहिंसाबादी असूनही आयुष्याच्या अखेरीस जातीय विद्वेष आणि हिंसा यांचेच थैमान बघण्याचे त्यांच्या भाळी का आले ? इंग्लंडने हिटलरपुढे संपूर्ण शरणागती पत्करावी असा उपदेश करणाऱ्या आणि अशी शरणागती पत्करल्याबद्दल फ्रान्सचे कौतुक करणाऱ्या गांधींनी जीनांना साध्या राजकीय सवलती का नाकारल्या ? सदर ग्रंथ गांधीजीच्या नितीपर आणि धार्मिक संकल्पनांचा मागोवा घेत त्या अनुषंगाने वरीची आणि गांधींच्या व्यावहारिक आणि वरल राजकीय यशापयशाची मीमांसा करतो. लेखकाचा हा प्रयत्न मूलगामी आणि सर्वस्वी वेगळा आहे. हे सर्व लेखन सामान्य वाचकाला आणि विचारवंतांनाही कृष्ट करील यात शंका नाही.