Shree Shambho Bharat | श्री शंभो भारत

Shree Shambho Bharat | श्री शंभो भारत
महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच 'छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जाज्वल्य पराक्रम' हे समीकरण प्रत्येकाच्या मनात रुजलेय. त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, त्यांचा स्वराज्य-विचार आणि स्वराज्य-निष्ठा स्वतःमध्ये रुजवत छत्रपती संभाजी महाराज यांनी मातृभूमीसाठी आपल्या रक्ताचा थेंब न् थेंब अर्पण केला. अशा या शिवपुत्राची, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची समग्र गाथा म्हणजे 'श्री शंभो-भारत' हे महाकाव्य होय. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला संपूर्ण इतिहास खरोखरच जसा घडला, तसाच वाचकांसमोर उलगडतो. विशेषत्वाने, 'जगातील पहिले उत्तरकालीन महाकाव्य' असा ज्याचा उल्लेख करता येईल.