Shreesakhi Radni Maharani Yesubai | श्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई

Dr. Shubha Sathe | डॉ. शुभा साठे
Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
Size guide Share
Shreesakhi Radni Maharani Yesubai | श्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई

Shreesakhi Radni Maharani Yesubai | श्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई

Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर प्रा. डॉ. सौ. शुभा साठे यांनी लिहिलेली मराठी सारस्वतातील तिसरी कादंबरी! या तिन्ही कादंबरीच्या लेखिका ह्या विद्वान स्त्रिया आहेत. येसूबाईचे जीवन एक निर्मळ पण खडतर, सात्त्विक पण सहनशीलतेचा परमावधी गाठणारे असे महानाट्यच म्हणावे लागेल. ललित लेखकाला अर्थात हा विषय मोलाचा ठरावा यात नवल नाही.ज्वलज्वलनतेजस संभाजी राजांच्या पत्नी महाराणी येसूबाई ह्यांच्या जीवनाचा कालखंड राजमहालापेक्षा शत्रूच्या छावणीतच अधिकतर गेला. दोन संस्कृतीच्या मध्यावर तब्बल ३० वर्षे शांतपणे त्या साध्वीने जीवन व्यतीत केले. २० वर्षे आपल्या पुत्रासह आणि १० वर्षे एकटे राहून त्यांनी शांतपणाने एक पुण्यप्रभाव निर्माण केला. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न धर्म आणि वासनेचा विषारी दर्प, यात दिवस काढणाऱ्या प्रति नूतनसृष्टी निर्माण करणाऱ्या युगपुरुषाच्या स्नुषा आणि ज्वलज्वलनतेजस संभाजी राजांच्या या महाराज्ञीने भारतीय नारींपुढे एक आदर्श निर्माण केला. अशा व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ चित्रण डॉ. सौ. शुभा साठे यांनी प्रस्तुत कादंबरीत रेखाटले आहे. आपल्या भाषा सौष्ठवावर त्यांनी विषयाची मांडणी उत्तम संवादांच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे येसूबाईंच्या त्यागपूर्ण जीवनाचा वस्तुनिष्ठ पट वाचकांपुढे उभा राहतो. मराठ्यांच्या इतिहासातील एका महाराज्ञीचा आदर्श स्त्रियांपुढे ठेवला आहे.

ISBN:
Author Name: Dr. Shubha Sathe | डॉ. शुभा साठे
Publisher: Lakhe Prakashan | लाखे प्रकाशन
Translator:
Binding: Paperback
Pages: 360
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products