Shreeshankarlila | श्रीशंकरलीला

Shreeshankarlila | श्रीशंकरलीला
सद्गुरू 'शंकर महाराज' म्हणजे लौकिकाच्या आतलं अलौकिक ! शंकर महाराज म्हणजे सत् चित् आनंद स्वरूप ! "कुणी त्यांना शाक्त म्हणत तर कुणी साक्षात शंकर !" "कुणी अवधूत अवलिया म्हणत तर कुणी ठार वेडा !" "कुणी सिद्ध समजत तर कुणी भ्रमिष्ट !" "कुणी योगी म्हणत तर कुणी भोगी !" "कुणी व्यसनी म्हणत तर कुणी ज्ञानी !" "पण शंकर महाराज द्वैताच्या पलीकडे होते. ज्यांनी अंतर्यात्रा करून स्वत:मधला आत्मरूप शंकर जाणला त्यांना हा परमात्मा शंकर कळला. शंकर महाराजांच्या जीवनावरील मृणालिनी जोशींनी लिहिलेली ही कादंबरी वाचकांच्या अंतर आत्म्याला साद घालून अनुभूतीची प्रचीती निश्चित देईल."