Shrikrushana Bhagwatgeeta Vayvasthapan Ani Vyaktimattwa Vikas | श्रीकृष्ण भगवद्गीता व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास

Shrikrushana Bhagwatgeeta Vayvasthapan Ani Vyaktimattwa Vikas | श्रीकृष्ण भगवद्गीता व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास
व्यक्तिमत्त्व विकासावरील पाश्चिमात्य लेखकांच्या पुस्तकांची रेलचेल, उपलब्धता व ते वाचून आपल्याला वाटते की, ‘व्यक्तिमत्व विकास’ ही संकल्पना पाश्चात्त्यांकडून आपल्याकडे आलेली आहे; मात्र आपल्याकडे पाच हजार वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या ‘वेद’, ‘उपनिषदे’, ‘भगवद्गीता’ यांसारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये या संकल्पनेची बीजे आहेत, हे मात्र आपल्याला माहीत नसते. नेमके हेच आपल्याला या पुस्तकातून समजते. माणसाला मिळालेली विचारशक्ती ही एक दिव्य शक्ती आहे. त्या विचारशक्तीच्या वरदानाने तो आपला विकास करून घेऊ शकतो, आदर्शसंपत्र बनू शकतो. हेच सकारात्मक विचार भगवद्गीतेत आलेले आहेत; कारण मुळात भगवद्गीता हा ग्रंथच विवेकाधिष्ठित, म्हणजेच विचारांवर आधारित आहे. त्यातील विचार सकारात्मक आहेत. त्यामुळेच या पुस्तकात भगवान श्रीकृष्णांच्या व्यवस्थापनातील व व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाच्या पैलूंची समग्र व साकल्याने चर्चा केलेली आहे. ज्यांना आपली प्रगती करून घ्यायची आहे, आपले व्यक्तिमत्त्व संपन्न करायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, आपले भवितव्य घडवायचे आहे, एक आदर्श माणूस होऊन समाजात आपली प्रतिष्ठा निर्माण करायची आहे, अशा सर्वांना हे पुस्तक मार्ग दाखवेल. तसेच ते प्रत्येकाला चांगले कर्म करण्यास,. आपल्यातील सुप्त शक्तीला चालना देऊन ती जागृत करण्यास, आत्मविश्वास वाढवून, नैराश्य दूर करून, चांगले विचार करण्यास व मनोबल उंचावण्यास प्रेरणा देईल.