Shrimant Chatrapati Sambhaji Maharaj Ani Thorale Rajaram Maharaj Yanchi Charitre | श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले छत्रपती राजाराम यांची चरित्रे

Shrimant Chatrapati Sambhaji Maharaj Ani Thorale Rajaram Maharaj Yanchi Charitre | श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले छत्रपती राजाराम यांची चरित्रे
श्रीमंत छत्रपती धाकटे शाहू महाराज ऊर्फ आबासाहेब सातारकर' ह्यांच्या आज्ञेवरून त्यांचे चिटणीस रा. मल्हार रामराव यांनी मागील कागदपत्रांचे दाखले पाहून व श्रुत असलेल्या माहितीवरून इ. स. १८१०-११ ह्या साली शककर्ते थोरले शिवाजी महाराजांपासून तो धाकटे शाहू महाराजांपर्यंत सर्व महाराजांची चरित्रे लिहिली. खुद्द मल्हार रामराव व त्यांचे पूर्वज हे मोठे हुदेदार असून महाराजांच्या अतिनिकट वागणारे असल्यामुळे सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यांत होती, आणि परंपरागत आलेली आतील बारीक-बारीक माहितीही त्यास इतरांपेक्षा विशेष होती. ह्यावरून अशी चरित्रे लिहावयास ते योग्य होते हे सांगणे नको.