Shubha Ani Mangal | शुभ आणि मंगल

Shubha Ani Mangal | शुभ आणि मंगल
वैवाहिक जीवनाच्या एकत्रित प्रवासाची तयारी कशी करायची? जीवनात येणार्या या बदलाला कसं सामोरं जायचं? या सर्व विषयातलं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं आणि ते जर मानसशास्त्रानुसार आणि त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींनी स्वत: केलं तर?हेच या पुस्तकात घडलं आहे. विवाहासाठी स्वत:ला अनुरूप करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? इथपासून ते घटस्फोटाची वेळ आलीच, तर तो टाळायचा कसा? आणि झालाच विवाहविच्छेद, तर तो हाताळायचा कसा? विवाहाची निरंतरता कशी राखायची? यांविषयीची अगदी बारीकसारीक माहिती या पुस्तकात आहे.पुस्तकाचे प्रमुख लेखन प्रतिभा देशपांडे यांनी केले असून सहलेखिकेची जबाबदारी डॉ. संजीवनी राहणे आणि शुचिता फडके यांनी पार पडली आहे.