Shubhmangal | शुभमंगल

Shubhmangal | शुभमंगल
शुभमंगल’ कथेतील सुनंदाच्या वडिलांचा चमत्कारिक स्वभाव तिला घर सोडून बाहेर पडण्यास भाग पाडतो. आपल्या मर्जीविरुद्ध लग्न करावे लागल्याचा राग ते इतक्या वर्षांनंतर मुलांवर, बायकोवर काढत असतात. त्यांना कुटुंबीयांची कोणतीच गोष्ट पटत नसते. त्यातच मुलीचे- सुनंदाचे लग्न आपल्या बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या वाया गेलेल्या मुलाशी लावण्याचा प्रयत्न ते करतात, तेव्हा आईला दुःखात ठेवून सुनंदावर घर सोडण्याची वेळ येते. ती आपल्या आपल्या मैत्रिणीच्या आधाराने पायांवर उभी राहते. अशातच योगायोगाने तिची ओळख मुकुंदाशी होते. दोघांची मने एकमेकांशी जुळतात. पण त्याच सुमारास देशातील परिस्थिती बिघडते. सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मतभेद होतात. संघ त्याविरुद्ध सत्याठाहाचे रणशिंग फुंकतो. त्यावर बंदी घातली जाते. यात मुकुंदाचे लक्ष तिकडे आकर्षिले जाते. देशप्रेमाने भारावलेला मुकुंद त्यात उडी घेतो. सुनंदाचे प्रेम मुकुंद स्वीकारतो का, त्यांचे शुभमंगल होते का, यासाठी वाचावी ’शुभमंगल’ कादंबरी.