Siddharth | सिद्धार्थ

Siddharth | सिद्धार्थ
डेमियन (१९०२) या काव्यसंग्रहानंतर हरमान हेसे यांची सिद्धार्थ ही कादंबरी १९२३ साली प्रसिद्ध झाली. १९२७ मध्ये स्टेपनवुल्फ, १९३० मध्ये नार्झिस अंड गोल्डमंड आणि १९४३ मध्ये द ग्लासबीड गेम प्रकाशित झाली. या खेरीज जर्नी टू द ईस्ट (१९३३) हे छोटेखानी पुस्तकही (अध्यात्मसाधनेचा प्रवास रेखाटणारे) हेसेच्या नावावर आहे. कवी, कादंबरीकार निबंधकार तसेच चित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेसे सांना १९४६ साली साहित्याबध्लचे नोबेल पारितोषिक मिळाले.हेमेच्या सिद्धार्थ कार्बरीने झपाटलेल्या कॉनराड रूकस यांनी त्यावर सिद्धार्थ नावाचा चित्रपट १९७२ मध्ये दिग्दर्शित केला. शशी कापूर आणि सिम्मी गरेवाल यांनी त्यात भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट समकीन चित्रपटांपेक्षा अनेक अर्थानी वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला.