Smashanat Phule Vechatana | स्मशानात फुलं वेचताना

Smashanat Phule Vechatana | स्मशानात फुलं वेचताना
स्मशानात फुलं वेचताना घालत होते हळुवार फुंकर नुकत्याच निवलेल्या शांत रक्षेवर मालिन्याचे सगळेच पापुद्रे झाल्यावर भस्म कशी उमलून आलीत शुभ्र अस्थिफुलं प्रत्येक फुलातला तुझा आदिम दरवळ रंध्रारंध्रातून शिरतोय आत शरीरबंधातून झालो होतोच ना विलग आतली घट्ट गाठ कशी उकलायची आणि तू तर कायमचाच गेलास शरीर टाकून रोखलेले हजारो डोळे तीक्ष्ण प्रश्नांचे गुच्छ घेऊन बघताहेत एकटक माझ्या चेहऱ्याकडे टिपत आहेत हलणाऱ्या प्रत्येक रेषेचे भाव देहबोलीचा घेत आहेत अदमास मला द्यायचे नाहीय उत्तर त्यांना आणि तुलाही.