Smrutichitre | स्मृतिचित्रे

Smrutichitre | स्मृतिचित्रे
मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. "हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे या रम्यतेचे अदभुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते."