Sphinx | स्फिंक्स

Sphinx | स्फिंक्स
ते सगळं साक्षीदार भयविस्फारित नजरांनी समोरचं अभूतपूर्व दॄश्य पाहात होते. सगळे इतके भयंकर हादरले होते की कुणाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. समोर घडलेली ती घटना म्हणजे जणु एक भयंकर आदियुगीन दु:स्वप्नच होतं...’ आपरेशन डूम्स डे - अकटिव्हेट!... अतिसंवेदनशील लष्करी सामुग्री वाहून नेणारा एक वेदर बलून स्वित्झर्लंडमधे कोसळला होता!... दहा लोकांनी ती घटना प्रत्यक्ष पाहिली!... त्यांना शोधून काढण्यासाठी यू एस नेव्हल इंटेलिजन्सचा बुद्धिमान कमांडर रॉबर्ट बेलॅमी याला ’टॉप सीक्रेट मिशन’ वर सक्तीनं पाठवण्यात आलं. तो तपास त्यानं हाती घेतला तेव्हा, स्विस आल्पसमध्ये कोसळला तो वेदर बलून नव्हता, असं त्याला आढळलं! पॄथ्वीच्या इतिहासातली एक अत्यंत अविश्वसनीय घटना तिथे घडली होती!! आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर बेलॅमीनं त्या दहा साक्षीदारांना शोधून काढलं, नि ते मिशन यशस्वी केलं. पण ते पुरं झाल्यावर काही प्रबल अज्ञात शद्ती खुद्द त्याच्याच जिवावर उठल्या! आणि मग सुरू झाला एक जिवघेणा पाठलाग!... वॉशिंग्टन ते झूरिक, रोम आणि पॅरिस अशा या चित्तथरारक प्रवासादरम्यान बेलॅमीचा जीवनपट उलगडत असताना काही प्रश्न उभे राहतात. जिच्यावर त्याचं निरतिशय प्रेम होतं अशी त्याची प्रियतमा त्याला सोडून का निघून गेली?... त्याचे अत्यंत निकटचे स्नेही त्याचे हाडवैरी का बनले?... स्विस आल्पस मधे घडलेली ती रहस्यमय घटना काय होती?