Sphinx |Mehta Publication) | स्फिंक्स् |मेहता पब्लिशिंग)

Sphinx |Mehta Publication) | स्फिंक्स् |मेहता पब्लिशिंग)
एरिका बॅरनला इजिप्तविषयी खूप आकर्षण असतं. इजिप्तविद्येची ती अभ्यासक असते. एकदा आपली सगळी कामं बाजूला सारून ती इजिप्तला जाते. तिलाही माहीत नसतं की तिच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे. तिथे गेल्यावर तिला शोध लागतो एका मौल्यवान खजिन्याचा. द व्हॅली ऑफ द किंग्जमधल्या चकाकत्या खजिन्यापेक्षा कितीतरी पटीनं तो खजिना मौल्यवान असतो. शेकडो शतके अज्ञात राहिलेल्या खजिन्याला भयंकर शाप असतो. फॅरोचा विलक्षण खजिना अस्तित्वात असल्याचं कोणालाही माहीत नसतं. इजिप्तविद्येची अभ्यासक असलेल्या एरिका बॅरनला त्याचा सुगावा लागतो आणि मग सुरू होतो थरारक पाठलाग आणि निर्घृण हत्यांची मालिका. फॅरोचं रहस्य, लोभ आणि सैतानी प्रवृत्तीतून काय बाहेर पडणार याची उत्सुकता वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. प्राचीन खजिन्यासाठी अर्वाचीन काळात रंगलेला संघर्ष रॉबिन कुकने नेहमीच्या विलक्षण पद्धतीने रंगवला आहे. एक थरारक, उत्कंठावर्धक कादंबरी.