Srushtichi Nirmiti Ani Itar Katha | सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा

Srushtichi Nirmiti Ani Itar Katha | सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा
जमीन नदी जंगल यासह सगळ्या नैसर्गिक भवतालात मिसळून गेलेलं प्राचीन लोकसमूहांचं आयुष्य आणि त्यांच्या आधारेच जगत राहण्याची त्यांची इच्छा या सगळ्यात लोककथांमधून डोकावताना दिसते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी ची विशुद्ध दृष्टी निर्माण करण्यासाठी लोकसाहित्याचा हा धागा त्यांच्या हातात द्यावा अशी या पुस्तका मागची कल्पना आहे. लोकसाहित्याचे सामर्थ्य भारतीय निसर्ग वाचवण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी उपयोगी पडावं आणि विशेषतः कुमार वर्गामध्ये निसर्गाविषयी अभिज्ञता आणि सन्मुखता निर्माण व्हावी हा या पुस्तका मागचा उद्देश आहे. लोककथां कडे पाहण्याची नवी दृष्टी देण्याचा आणि या पारंपारिक साहित्यातून डोकावणारं निसर्ग भान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.