Sthalkal Aakashwani | स्थळकाळ आकाशवाणी

Sthalkal Aakashwani | स्थळकाळ आकाशवाणी
हाती आलेल्या माध्यमाची जाण आणि आपल्या कामाचं मर्म नेमकं ओळखलं की काय घडू शकतं याचे हे वस्तुपाठ. 'स्थळकाळ आकाशवाणी' या पुस्तकात असे वस्तुपाठ पानोपानी मिळतात. आदिवासींच्या आंदोलनाबाबत जाणून घ्यायचंय, चला घटनास्थळी.. जंगलातल्या पक्षी-प्राण्यांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा. माध्यमांना ज्यांनी दूर ठेवलं आणि माध्यमं ज्यांच्याशी अंतर राखून वागली त्या, नेमाडे, दुर्गा भागवत यांचं माध्यमांशी मनोमीलन.. जयंत नारळीकरांसारख्या दिग्गज शास्त्रज्ञाचं लेखन बालश्रोत्यांच्या वाट्याला येणं.. असं बरंच काही. ज्यांनी त्या त्या वेळी या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे, अशांना 'स्थळकाळ आकाशवाणी' एक वेगळाच आनंद देऊन जातं. केवळ स्मरणरंजनाचा नव्हे तर त्या कार्यक्रमांच्या निर्मितीप्रक्रियेचा उलगडा होण्याचा, एका ठोस विचाराचा आणि भूमिकेचा परिचय होतो म्हणून हे पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय.