Stri Likhit Marathi Katha |1950 - 2010) | स्त्री लिखित मराठी कथा |१९५० - २०१०)

Stri Likhit Marathi Katha |1950 - 2010) | स्त्री लिखित मराठी कथा |१९५० - २०१०)
स्त्री-लिखित मराठी कथा : १९५० ते २०१०' हा या प्रकल्पाचा दुसरा खंड आहे. कमल देसाई यांच्यापासून मोनिका गजेंद्रगडकर यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांच्या अकरा स्त्री - कथाकार या खंडात विचारार्थ निवडल्या आहेत. "एक सर्जनशील व्यक्ती म्हणून या लेखिकांची घडण कशी झाली त्यांच्या कथेचे विषय त्यांनी कसे आणि का निवडले मानवी समाज सामाजिक संस्था साहित्य धर्म राजकारण नातेसंबंध आणि संस्कृतीविषयी या लेखिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत समकालीन कथेकडे आणि वाङ्मयीन परंपरेकडे त्या कशा पाहतात माध्यमांशी त्यांचे नाते कसे आहे आणि त्यांची एकूण जीवनदृष्टी कशी आहे कशी घडली आहे या अनुषंगाने घेतलेल्या या मुलाखती आहेत."