Stri Likhit Marathi Kavita |1950 - 2010) | स्त्री लिखित मराठी कविता |१९५० - २०१०)

Stri Likhit Marathi Kavita |1950 - 2010) | स्त्री लिखित मराठी कविता |१९५० - २०१०)
स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह इथे समोर ठेवली आहे. स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी, धीटपणे शरीराविषयी, शरीरसंबंधांविषयी बोलणारी, स्त्रीच्या आदिम दुःखाशी आणि तिला सोसाव्या लागणाऱ्या, जीवनाच्या अर्थशून्यतेचा प्रत्यय देणाऱ्या एकाकीपणाशी नाळ जुळून असणारी, आजच्या माणसाचं जगणं शब्दांत पकडू पाहणारी, एकूणच मानवी जगण्यातल्या अगतिकतेच्या जाणिवेने अस्वस्थ होणारी आणि तरी सामान्य, बंधयुक्त जगण्यातही पाय रोवून उभी असणारी, सामाजिक जाणीव गाभ्यातच घेऊन कृतिशीलतेचा हात धरू पाहणारी - अशी विविधांगी कविता लिहिणाऱ्या या कवयित्रींनी स्वतःच्या अनुभवविश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेतला आहे.