Strimiti : Nivdak Milun Saryajani | स्त्रीमिती : निवडक मिळून साऱ्याजणी

Strimiti : Nivdak Milun Saryajani | स्त्रीमिती : निवडक मिळून साऱ्याजणी
विद्या बाळ यांनी 'मिळून सार्याजणी' मासिकाला सुरुवात केली आणि 'स्त्री' संवेदनांना, तिच्या जाणिवांना एक वेगळी वाट मिळाली. एक चळवळ म्हणून मासिकाची निर्मिती झाली. त्यामुळे यातील लेखांचे योगदान बहुमोलाचे आहे. कलात्मकता आणि प्रबोधनपरता या दोन्ही प्रेरणांना यामध्ये स्थान दिले गेल्याने आतापर्यंत अनेक विचारांचे बीज मासिकाद्वारे जनमानसात रुजले. वाचकांच्या विचारांचे क्षितिज उंचावण्यासाठी लेखमाला, मुलाखती, परिसंवाद, वाचक चर्चा, स्त्रीविश्वाशी संबंधित अनेक नवे पैलू यात आले. पुस्तकरूपाने अशा लेखांची मांडणी व्हावी हेच उद्दिष्ट पुस्तकनिर्मितीमागे आहे. वीस वर्षांतील एकूण ४५ लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. संपादन डॉ. नीलिमा गुंडी यांचे आहे.