Striya Ani Dahashatvad | स्त्रिया आणि दहशतवाद

Striya Ani Dahashatvad | स्त्रिया आणि दहशतवाद
एरव्ही सोशिक, सहनशील, प्रेमळ अशी प्रतिमा असलेली स्त्री पुरुषांच्या बरोबरीने यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करीत आहे आणि दुसरीकडे दहशतवादी संघटनांमध्ये सामील होत आहे. कडवी अतिरेकी होत आहे, यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न लेखिकेने या पुस्तकातून केला आहे. "दहशतवाद म्हणजे नेमके काय त्याचा उगम कसा झाला दहशतवादी संघटनांची बांधणी संघटनांचा विस्तार दहशतवादाची कारणे याबाबतची उपयुक्तमाहिती लेखिकेने पुस्तकाच्या सुरुवातीला करून दिली. तसेच जगातील विविध देशांमध्ये दहशतवादाचा जन्म कसा झाला त्यानंतर तो कसा फोफावला यामध्ये स्त्रियांचा समावेश कधी झाला कसा आणि किती प्रमाणात असतो याचीही माहिती विविध प्रक रणांद्वारे करून दिली आहे. अनेक महत्त्वाच्या दहशतवादी स्त्रियांचीही ओळख लेखिकेने करून दिली आहे. तसेच काही कुख्यात स्त्री दहशतवाद्यांना संघटनेत आलेले अनुभव तर मन विषण्ण करणारेच आहेत." "श्रीलंका पॅलेस्टाईन चेचेन्या इंडोनेशिया इराक उत्तर युगांडा व सिएरा लिऑन आर्यलड एल साल्वादोर नेपाळ तुर्कस्तान व्हिएतनाम आणि भारत या देशांमध्ये वाढत चालेल्या दहशतवादी संघटना आणि त्यामधील स्त्रियांचा सहभाग याचा वेध लेखिकेने घेतला आहे. या मुख्य देशांव्यतिरिक्त झिम्बाब्वे उरुग्वे निकारगुआ या देशांतील विविध दहशतवादी चळवळींची थोडक्यात माहिती शेवटच्या प्रकरणामध्ये देण्यात आली आहे. लेखिकेने या वेगळ्या विषयावर मराठीत पुस्तक लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. जगातील दहशतवादाचे वेगवेगळे कंगोरे त्यांनी स्वच्छपणे आणि स्पष्टपणे सांगितले आहे."