Sugam Marathi Vyakran |9th - 10th Std.) | सुगम मराठी व्याकरण |इयत्ता नववी ते दहावी साठी)

Sugam Marathi Vyakran |9th - 10th Std.) | सुगम मराठी व्याकरण |इयत्ता नववी ते दहावी साठी)
इयत्ता नववी व दहावीच्या व्याकरण व उपयोजित लेखन या विभागातील सर्व घटकांचे विस्तृत विश्लेषण या पुस्तकामध्ये दिले आहे. काव्यसौंदर्य व रसग्रहण या घटकांचा कृतींसह यामध्ये समावेश केला आहे. पहिली ते आठवीच्या व्याकरणाची उजळणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. प्रत्येक घटकातील संकल्पनांचे महत्त्वाच्या टिपांसह स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी भरपूर कृतींचा यामध्ये समावेश केला आहे. स्वमताच्या प्रश्नांबद्दल विशेष मार्गदर्शन यामध्ये केले आहे. अभ्यास कसा करावा, आदर्श उत्तरे कशी लिहावीत याविषयी महत्त्वाच्या टिपांचाही यामध्ये समावेश केला आहे. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय सोपा करून सांगणारे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक!