Sukhacha Lapandav | सुखाचा लपंडाव
Sukhacha Lapandav | सुखाचा लपंडाव
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर यांची ‘सुखाचा लपंडाव’ ही कादंबरी प्रेमत्रिकोनाची शोकांतिका म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने संघकार्यात निष्ठेने भाग घेणारा सुखवस्तू व सुशिक्षित तरुण कुमार आणि चारचौघींसारखी दिसणारी, सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशील, सुस्वभावी कॉलेजयुवती पुष्पमाला तसेच गौर वर्णाचे, बंगाली वाटावेत असे सालस युवक डॉ. सतीश या तिघांची ही प्रेमकहाणी आहे. कादंबरी वाचताना अगदी अखेरपर्यंत मनोरंजन होत राहाते. मात्र, या कलाकृतीचा परिणाम वाचकाला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा गंभीरपणे विचार करावयास लावणारा आहे.