Sukhi Mansacha Sadara | सुखी माणसाचा सदरा

Sukhi Mansacha Sadara | सुखी माणसाचा सदरा
समाधानाची फुलं बरसवणारा पारिजात खरं तर प्रत्येकाच्याच अंगणात बहरलेला असतो. आपण फक्त हात पुढे करायचा अवकाश, खुषीच्या फुलांची बरसात अविरत होत रहाते. आपल्या करिअरमध्ये नोकरी-व्यवसायात यश प्राप्त झालं की सुख, समाधान, आनंद वाटतो हे खरंय. प्रत्येक यशाकांक्षी व्यक्तीनं याकरता पद्धतशीरपणे प्रयत्न करायला हवेत हेही कबूल. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचं असतं ते आनंदी वृत्तीचा चष्मा डोळ्यांवर घालणं. एकदा का तो घातला की सर्वत्र इंद्रधनुष्यातील नितांत सुंदर रंग दिसू लागतात, आणि सगळं जगणंच एक आनंदाचा न संपणारा जल्लोषमय उत्सव बनून जातं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यावर यश कसं मिळवावं याचे मूलमंत्र सांगणारं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुखी, समाधानी व आनंदी कसं व्हावं याचं रहस्य उलगडून दाखवणारं पुस्तक म्हणजे सुखी माणसाचा सदरा!