Sukhpahat | सुखपहाट
Sukhpahat | सुखपहाट
सकाळ सप्तरंग पुरवणीत प्रवीण दवणे यांनी लिहिलेला 'साद दे हृदया' हा स्तंभ लोकप्रिय झालं होतंk. या स्तंभातील लेखांची दोन पुस्तके करण्यात आली आहेत.' साद दे हृदया' आणि 'सुखपहाट' या दोन पुस्तकात मिळून ४९ लेख आहेत. सुखपहाटमध्ये जीवनसौंदर्यविषयक लेख आहेत. त्यामध्ये मैत्रीचे जीवनसंगीत, त्याचबरोबर चौरंग सामाजिक अध्यात्माचा, आदी लेख विशेष उल्लेखनीय आहेत. तसेच मोडला नाही कणा आणि अमृतसाधना हे लेखही वाचनीय असे आहेत. परस्परांशी हरवत चाललेल्या संवादाचा आग्रह धरणारे, तसेच आपुलकीने प्रत्येक मुद्द्याकडे पाहणारा लेखक यातील लेखातून वाचकांशी चटकन संवाद साधतो.