Sumbran | सुंबरान

Sumbran | सुंबरान
कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, ललितबंध, समीक्षा ह्या सर्व साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा परिचय ‘सुंबरान’ या छोटेखानी पुस्तकात आहे, त्याचबरोबर पत्रांतून निर्माण झालेल्या साहित्यकृतींचे वेगळेपण ‘सुंबरान’ने प्रथमच लक्षात आणून दिले आहे. साहित्यप्रकाराच्या मागणीनुसार लेखाचे रूप परिचयापासून आस्वादक समीक्षेपर्यंत बदलत असले तरी प्रस्तावनेत प्रा. सुधीर रसाळ लिहितात त्यानुसार, ‘सर्व लेख जरी भिन्न भिन्न स्वरूपाचे असले तरी या सर्व लेखनाचा अंतिम उद्देश साहित्यकृतींबद्दल कुतूहल जागे करणे आणि वाचकाला या साहित्यकृतींचा आस्वाद घेण्यास उद्युक्त करणे हा आहे…..