Super 30 | सुपर ३०

Super 30 | सुपर ३०
पाटण्यातील गौदिया मठ येथे जन्मलल्या आनंद कुमारला गणितातील संशोधनासाठी व उच्चतम शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठाने प्रवेश देऊ केला असूनही तो पैशाअभावी तेथे जाऊ शकला नाही. त्या ऐवजी त्याला पापडांचा व्यवसाय करावा लागला. वाट्याला आलेल्या दुर्दैवी परिस्थितीला नावे न ठेवता २००२ साली आनंद कुमारने (गुरुकुलासारखी) एक नवी संशोधित शाळा सुरू केली. समाजातील तळागाळातले हुशार विद्यार्थी निवडून आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी त्यांची तयारी तो या शाळेत करुन घेऊ लागला. सुपर ३० मधील विद्यार्थ्यांनी जे सातत्यपूर्ण यश मिळवले ते आश्चर्यकारक आहे. दर वर्षी तीस विद्यार्थ्यांपैकी सरासरी २७ ते २८ विद्यार्थी आयआयटीमध्ये जाण्यासाठी निवडले जाऊ लागले. आपले हृदय पिळवटून टाकणारी, समाजमनातील प्रस्थापित विचारांना गदागदा हालवणारी एका द्रष्ट्याची ही असामान्य कहाणी आहे. शिक्षणाच्या सहाय्याने आनंदकुमारने गरिबी व अज्ञानाच्या धुळीत झाकल्या गेलेल्या बौद्धिक चैतन्याला आवाहन केले.