Sutre Netrutva Vikasachi | सूत्रे नेतृत्व विकासाची

Sutre Netrutva Vikasachi | सूत्रे नेतृत्व विकासाची
शिक्षक, लघुउद्योजक, बँकर... कोणत्याही क्षेत्रात कामकाजाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक ज्याला आपण ‘व्यवस्थापक’ म्हणतो तो आवश्यक असतोच. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जर नेतृत्व करायचे असेल, तर ‘द लीडरशिप – मास्टरक्लास’ मार्गदर्शक ठरेल. नेत्यामध्ये कोणती एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये असावीत, याविषयी या पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे. योग्य मूल्य व संस्कृतीच्या आधारे नेत्याने सहकार्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करावं, एकविसाव्या शतकातील आदर्श नेता होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, यावरही या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेक यशस्वी उद्योजकांचे, नेत्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि शहाणपणाचे बोल या पुस्तकात त्यांनी स्वत: सांगितले आहेत. आत्मविश्वासाबरोबरच एका आदर्श नेत्याकडे माणुसकी असणे किती आवश्यक आहे तेही सांगितले आहे. सदर पुस्तक नेतृत्वगुणांच्या विकासाला योग्य मार्गदर्शन करेल हे निश्चित.