Svayampakgharatil Davakhana | स्वयंपाकघरातील दवाखाना

Svayampakgharatil Davakhana | स्वयंपाकघरातील दवाखाना
स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा काही ना काही उपयोग असतोच. आपल्याला असे वाटते, की मसाल्याच्या पदार्थांचा म्हणजे लवंग, जिरे, धणे, तिखट, हळद वगैरेंचा खास उपयोग असेल; परंतु साधे तांदळा-गव्हाचे पीठ यांचाही इलाज करण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. पोटिस करण्यासाठी पीठ उपयोगात येते. एकूणच स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक पदार्थांचा औषधी उपयोग असतो. या पदार्थांचे गुणधर्म लक्षात आल्यामुळे केलेला स्वयंपाक पचनाला अधिक सोपा व संतुलित होऊ शकेल. शिवाय, कुणाला काही किरकोळ आजार झाला तर प्राथमिक घरगुती उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा उपयोग करून घेता येईल. यासाठी स्वयंपाकघरातील पदार्थांच्या गुणधर्माबद्दल नीट माहिती पाहिजे.या पुस्तकात स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.