Swabhavala Aushadh Ahe | स्वभावाला औषध आहे

Swabhavala Aushadh Ahe | स्वभावाला औषध आहे
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् म्हणून संंबोधल जातं, असे शारिरिक विकारही यातून उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होउन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हदयरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इत्यादी. मानसिक तणावामुळं हे विकारवाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते.