Swad Sanwad | स्वाद संवाद

Swad Sanwad | स्वाद संवाद
'साहित्य आणि कृती' ही पाककृतींच्या पुस्तकांची सर्वसामान्य रचना. मात्र या पुस्तकात मावशी-भाचीच्या संवादातून पाककृतींची माहिती दिलेली आहे. पुस्तकात रोजचे आणि नवे पदार्थ आहेतच, शिवाय इन्स्टंट युगातल्या पदार्थाची कृती मायक्रोवेव्हच्या तंत्रातून दिली आहे.पूर्वीच्या काळी पाककृतींच्या प्रशिक्षणाचं केंद्र स्वयंपाकघर होतं आणि शिक्षिका होत्या, आई-आजी-मावशी. पसाभर, चिमूटभर, लिंबाएवढा अशी अनुभवसिद्ध मापं वापरून प्रात्याक्षिकातून हे शिक्षण दिलं जायचं. तसंच पिढयानपिढ्यातून ते हस्तांतरित व्हायचं. आता आई, आजी, मावशी, काकू, ताई, आत्याच्या प्रयोगशाळेची जागा पुस्तकं आणि प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. मात्र त्या शिकवण्यात जो सहजपणा आणि जिव्हाळा होता तो मात्र हरवला आहे. हा हरवलेला जिव्हाळा अंशत: तरी अनुभव 'स्वाद-संवाद' या पुस्तकातून मिळतो.