Swami Vivekananda Ani Mahatma Gandhi | स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी

Swami Vivekananda Ani Mahatma Gandhi | स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी
प्रा. डॉ. विश्वास पाटील यांचे ‘स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी’ हे पुस्तक या दोन महानायकांच्या जीवनातील आणि कार्यपद्धतीतील शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने यांतील विस्मयकारक साम्य दाखवत आणि त्या दोघांच्या विचारांतील, एकमेकांत सरमिसळ झालेली, आपणास फारशी न जाणवलेली साम्यस्थळे अधोरेखित करत उभे आहे. हे या अतिशय महत्त्वाच्या विषयावरचे पहिले पुस्तक आहे. हे पथदर्शक म्हणून उभे आहे. परिपूर्ण अभ्यास, साधी, सोपी, सरळ, प्रवाही शैली आणि आजवर कोणीही हात न लावलेला एक नवा विचार – यांच्या त्रिवेणी संगमावर हे पुस्तक उभे आहे. या पुस्तकात काय आहे, ते भरभरून सांगता येईल; मात्र काय नाही, हे शोधूनही सांगता येणार नाही. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (ज्येष्ठ अभ्यासक व लेखक)