Swapnanche Shiledar | स्वप्नांचे शिलेदार

Swapnanche Shiledar | स्वप्नांचे शिलेदार
गरिबी, बेरोजगारी, दुष्काळ अशा अनेक कारणांमुळे होणारे कौटुंबिक स्थलांतर, पालकांमधील बेबनाव, आइवडिलांपैकी एकाचे किंवा दोघांचेही मृत्यू, आई किंवा वडिलांनी दुसरा घरोबा करणे, अशा अनेक कारणांमुळे एरवी आजूबाजूलाच वावरणार्या पण सर्वसामान्यांच्या जीवनापासून सूर असणार्या या मुलांचे भावविश्व अक्षरश: उदध्वस्त होते आणि ती अकाली प्रौढ बनतात. अनेक मुलांना शहरात काही ना काही काम करून घराचा पालनकर्ता बनावे लागते. ज्या वयात आनंदाने बागडायचे, शिक्षण घ्यायचे, त्या वयात कामाच्या ओझ्याने त्यांचे खांदे आणि मन दबून जाते. गुन्हेगारीच्या वावटळीत अनेक मुलांची आयुष्ये सापडतात.अशा या अंधारलेल्या परिस्थितीत स्वत:ची छोटी छोटी शिक्षणस्वप्ने जपणार्या मुलांची कौतुकास्पद धडपड रेणू गावस्कर यांनी या पुस्तकात मांडली आहे.